Journey of the School of Earth Sciences

   

Journey of the School of Earth Sciences

Swami Ramanand Teerth Marathwada University:

Past, Present and Future

PAST:

In the journey of a human or an institute, first twenty five years is just the right time to review the past achievements, assess the present status and design the future goals. We would like to begin the story of School of Earth Sciences’ Journey by thanking all the stakeholders who played a direct or indirect role in the growth of the School.

The journey of the School of Earth Sciences in the past twenty five years is no less than spectacular. The School of Earth Sciences is one of the first Schools to be initiated in the newly established University in the Nanded city of Marathwada region christened after renowned freedom fighter and educationalist “Swami Ramanand Teerth”. The School of Earth Sciences had begun its academic journey in 1994 with 2 Students and 5 Faculty Members and a single Masters course in Geology. The School was housed, as were other Schools of the University, in the old irrigation department residence and office space within Vishnupuri area of Nanded. It was both a challenge and an opportunity for the young faculty who have joined the School to build the School and their careers from the scratch. All the faculty members were passionate about the progress of the School and enthusiastically worked for academic and infrastructural growth of School not withstanding many constraints inherent for a budding institute.                                   

First five years were spent in acquiring basic equipment, teaching tools and strengthening the Geology course. During this period a seismic centre was also established in Killari. The School has shifted the new sprawling University campus that came-up on the nearby plateau. The present campus of the University is awe-inspiring with its geographical spread and spatial splendour! Spread over more than 500 acres on an elliptical plateau the campus is boasted with one of the gigantic and beautiful administrative buildings, 14 Schools and a centrally located Knowledge Resource Centre. However, we were tenants in the School of Life Sciences for some time before we moved to our own building. Equipped with required infrastructure, faculty and own building, the School entered into an expansion mode and introduced Post-Graduate courses in Environmental Science, Geography and Geophysics. The School of Earth Sciences boasts one of the very well kept Geological Museums and a unique seismic centre. The School slowly but steadily attracted students not only from different parts of Maharashtra but also from other states. 

From its inception, the School of Earth Sciences has been committed to giving quality education to students, promoting high-quality teaching and fundamental research in Earth Sciences. The School of Earth Sciences excels in providing encouraging and inspiring environment for students’ academic growth. The Faculty members of School of Earth Sciences are well-qualified with national and international reputation. The strength of our School is positive commitment to work towards achieving the academic goals. To inculcate research temperament, project work is made mandatory for Master students in the School of Earth Sciences. These projects are not mere compilations of existing data but are soundly based on new data generated exclusively for the project. A weekly presentation of ongoing research under the banner “Saturday Seminar” not only keeps researchers on their toes but also inculcates research mindset in the Masters students.  

Students of the School of Earth Sciences regularly participate in National level student programs being organised by IITs, National Institutes and Industries. The students of the School of Earth Sciences not only actively involved in these competitions but also have and excelled in many of them. Our Students continuously take part in Summer/Winter training programs at CSIR-NGRI, Hyderabad, Indian Institute of Geomagnetism, Mumbai, Indian Seismological Research Centre, Ahmadabad, IIIT, Hyderabad, Atomic Mineral Division, Hyderabad, ONGC, Goa, NEERI, Nagpur, Geological Survey of India, Hyderabad, NRSC, Hyderabad, Environmental Industries, Pune, APSRAC, Hyderabad among others.  

Indian Institute of Geomagnetism, Mumbai has been providing 5 scholarships (GRASP-IIG) to our II year meritorious students from M.Sc. (Geophysics and Geology) @1000/per student for 10 months.  This is a unique scholarship program offered by the IIG to M.Sc. students of the School of Earth Sciences.  

The School of Earth Sciences, SRTM University, is recognized by the American Institute of Professional Geologists (AIPG) as the First International Student Chapter outside USA. The School has Memorandum of Understanding (MoUs) and academic collaborations with many National and International institutions. The School has been having academic and research association with Research organizations like NGRI, IIG, NCS, ISR, GSDA through MoUs for academic collaborations, student training and innovative research programs. The School has also signed MoUs with different colleges to maintain the academic relationship and sustainable growth in the field of Earth Sciences.  

Many renowned scholars visited the School in the past 25 years. Prominent among them include: Dr. Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar.  Padma Shri Dr. H.K. Gupta, Padma Shri Dr. V. P. Dimri, Dr. Krishna Lal (President, INSA), Dr. V. Rajamani  (JNU), Prof. C. Leelanandam (Osmania University), Prof. V. K. Gaur (Distinguished Scientist, IIA), Dr. T. Radhakrishna (NCESS), Dr. T. Harinarayana (Director, GERMI, Gujarat), Dr. Y.V.N. Krishna Murthy (Director, NRSC, Hyderabad), Dr. Swarna Subba Rao (Survey of India, Govt. of India), Dr. V.K. Gahalaut (Director, National Center for Seismology, New Delhi), Dr. S.V.S. Kameswara Rao (GM, RSRAC (ISRO), Nagpur), Prof. Praveen Saptarshi (Professor Emeritus, SPPU), Dr. H. Sarvothaman (Ex. Dy. Director General, GSI), Dr. Mala Bagiya (Scientist, IIG, Mumbai), Prof. K.S. Krishna (University of Hyderabad), Dr. V. Suresh Babu (NIRD, Hyderabad) and Prof. Vaidya (JNU).  

The School has hosted Fulbright Teacher fellows from USA. Dr. L. Joe Morgan, Jackson Vile University, Alabama, USA visited School of Earth Sciences under FULBRIGHT teacher fellowship and taught GIS course to our students for five months in 2011. Drs. Jim Jacobs, Steve Baker, Chin Man Moc visited School of Earth Sciences for 6 weeks under FULBRIGHT Senior Specialist Grant in 2012.  

PRESENT: 

Presently there are more than 135 Post-Graduate students are studying in 4 different Courses including Geology, Geophysics, Environmental Science, and Geography in the School of Earth Sciences. Additionally, the School runs Post-Graduate Diploma Course in Geoinformatics and Certificate Course in Industrial Safety and Occupational Health.  

Fifty Eight Research Scholars from the School of Earth Sciences have been awarded Doctoral Degrees and presently around fifty Ph.D and M.Phil Scholars have been carrying out cutting-edge fundamental and societal-driven research in the School of Earth Sciences. Many of the scholars earned DST-INSPIRE, CSIR, UGC, ICSSR, BARTI, RGNF and other fellowships for conducting their research. The fact that the School has published more than 120 research papers in the last 5 years in reputed high-impact national and international journals ouches for the quality of research being carried out in the School of Earth Sciences.  

Research Thrust Areas in the School of Earth Sciences include: microbiological Evaluation of Fresh Water Quality, Fluoride Contamination of Ground Water, Ground Water Pollution, Land use Mapping, Environmental Education, Disaster Management, Social and Settlement Geography, Crop and Soil Geography, Water Resource Planning for Agriculture, Agro-Climatology, Seismological Data Modelling for Structure & Tectonics, Geophysical Applications for Ground Water and Mineral Resources, Geochemical modelling of Magmatic Sedimentary processes.  

Currently twelve permanent faculty members (albeit two faculty members retired recently) and eight contributory faculty offer their expertise in different branches of Earth Sciences. The faculty members of the School of Earth Sciences have earned laurels and recognitions at Institutional, State, National and International Levels. To name a few: INSA Teacher Award (2018), Government of Maharashtra Rashtrapita Mahatma Gandhi Vyasanmukti Seva Puraskar for Social Work (2018), European Association Geoscientists & Engineers – PACE-Award (2013, 2016 and 2019), Maharashtra Best Teacher Award (2009-10 and 2013-14), SRTMU Best teacher award (2010-11 and 2013-14), National Geoscience Award, Ministry of Mines, Govt. of India (2013), JGSI-B.P. Radhakrishna award (2009), Indo-US Research Fellowship (2008-2009), BOYSCAST (2000-2001) Fellowship. The faculty members of the School of Earth Sciences are Fellows of the Geological Society of India, Indian Geophysical Union, and other scientific bodies.  

The faculty members of the School have served the University in different capacities including as Vice-Chancellor, In-charge Vice-Chancellor, Director (Board of College and University Development), Dean, Coordinator of NAAC and IQAC, Programme Officer of NSS, Coordinator of Avishkar, Coordinator of AVHAN-2019, Coordinator of RUSA, Member of Management Council, Academic Council and Senate, Rector and Warden of hostels, Coordinator of International Student Centre among others.  

The School is funded by UGC-SAP, DST-FIST, RUSA and UGC-Innovative programs. The faculty members operate many extramural sponsored projects. The School of Earth Sciences has generated funds to the tune of ~ 5 crores through research projects from DST-FIST, UGC-SAP, UGC Innovative Program, RUSA, ICSSR and other funding agencies. Centre of Excellence in Seismology (a RUSA initiative) is recently been established in the School of Earth Sciences.     

The School has been in forefront in carrying out many socially relevant activities including: Roof water harvesting. Earthquake Awareness, Outreach programs, International Earth Science Olympiad (IESO) for X & XII students, National Science Day, DST-INSPIRE programs for 11th and 12th students, inviting School Children to SES labs, monitoring, maintenance & analysis of Digital Seismic Station Data of Municipal Corporation, Nanded, Popular Lectures, Radio talks and TV interviews, peace keeping during public functions through POLICE MITRA program, development of alternative approach towards the Disaster Mitigation in Society, Environmental Education and Awareness programs, Nirmalya collection and public awareness programs during Ganeshotsav, Eco-friendly Ganesh Idol making, Voter Awareness program, National Integration Rally, Tiranga Rally, Blood donation camps and Swachh Bharat (Cleanliness drive).

FUTURE:

Presently, the School of Earth Sciences is considered as one of the top ranked campus Schools by many assessing agencies including NAAC and UGC. The School has many firsts to its credit within the University including introduction of ‘Credit System’ and ‘CBCS’ pattern, offering Credit Exchange, initiation of individual Research Project, obtaining ‘FIST’ from the DST, ‘SAP’ from the UGC, and ‘Innovative Program’ from UGC, hosting ‘Fulbright Fellows’ from USIEF, equipping classrooms with OHP & LCD, providing Laptop computers to all the faculty members, having ‘Adjunct Faculty’ and initiating three fold MoUs with Universities, Research Institutes and Industries among others.  

Having achieved impressive progress in the first twenty five years of establishment, we have definite goals for the School’s future. At present the School of Earth Sciences has needed infrastructure and software for the Masters programs and is on an ambitious path to procure sophisticated instruments to carry out advanced research. The School has been making efforts that every student from the School would undergo training in reputed Universities and Institutions. The School has been striving hard to provide Fellowship to the needy students based on merit. It is the endeavour of the School that the students should publish at least one research paper from their Post-Graduate Dissertation work.  

The School has initiated Campus recruitment on a modest scale and more than 15 students were recruited in this year. We would like to see that all our students get recruited through the on-campus recruitment in near future.  

The School of Earth Sciences is one of the progressive and vibrant academic departments in India in the field of Earth Sciences. We, all the stakeholders, have a dream... to see the School of Earth Sciences among the top 10 Earth Science Departments of our Country in the coming 5 years. We believe that we are moving in that direction.  

The march is on !!

Faculty Members

Research Scholars, Students

Administrative Staff

School of Earth Sciences

Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded – 431606

Maharashtra, INDIA

 ==================================================================================

भूशास्त्र संकुलाचा सुवर्ण प्रवास

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पार्श्वभूमी

मानवाचा किंवा एखाद्या संस्थेच्या कार्य प्रवासामध्ये, पहिली पंचवीस वर्षे ही विकासात्मक कार्याच्या पाऊल खुणांचा आढावा घेण्यासाठी, सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यातील उद्दिष्टांची आखणी करण्यासाठीचा योग्य वेळ आहे. यानिमित्ताने आम्ही, आमच्या संकुलाच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बहुंगांणी भूमिका बजावलेल्या सर्व घटकांचे आभार मानून “भूशास्त्र संकुलाचा सुवर्ण प्रवास” या वर्णन कथेची सुरुवात करू इच्छितो.

गेल्या पंचवीस वर्षातील भूशास्त्र संकुलाचा प्रवास अगदी नेत्रदीपक असा आहे. प्रख्यात स्वातंत्रसेनानी आणि शिक्षणतज्ञ ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांच्या नावाने मराठवाडा प्रदेशातील, नांदेड येथे विद्यापीठाची नव्याने उभारणी करण्यात आली. ‘भूशास्त्र संकुल’ हे विद्यापीठात सुरुवातीस प्रारंभ झालेल्या संकुलांमधील एक संकुल आहे. सन १९९४ ला २ विद्यार्थी, ५ अध्यापक आणि भूगर्भशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासह भूशास्त्र संकुलाचा प्रवास सुरु झाला. विद्यापीठाच्या इतर संकुलांप्रमाणे, नांदेडच्या विष्णुपुरी भागात जुन्या पाटबंधारे विभागाच्या निवासस्थानी व कार्यालयीन जागेत या संकुलाची उभारणी करण्यात आली. संकुलात रुजू झालेल्या तरुण अध्यापकांना संकुल आणि त्यांची कारकीर्द, नव्याने उर्द्धींगत करण्याचे दुहेरी आव्हान आणि एक संधी होती. सर्व अध्यापक हे संकुलाच्या प्रगतीबद्दल उत्साही होते. त्यांनी बाल्यावस्थेतील या संकुलाच्या मूलभूत अडचणींचा सामना करत करत, शैक्षणिक आणि सुविधांच्या पायाभूत विकासासाठी अगदी हिरीरीने कार्य केले.

पहिली पाच वर्षे ही मूलभूत उपकरणे, अध्ययनाची साधने आणि भूगर्भशास्त्राचा अभ्यासक्रम बळकट करण्यात गेली. याच काळात किल्लारी येथे भूकंप मापनाचे केंद्र देखील स्थापन केले गेले. नजीकच्या पठारी भागावर, विद्यापीठाच्या नवीन व कायमस्वरूपी उभारत असलेल्या परिसरात संकुल स्थलांतरित करण्यात आले. भौगोलिक विस्तार आणि स्थानिक वैभव यामुळे विद्यापीठाचा सध्याचे परिसर, आहे  अगदी विस्मयकारक ! सुमारे ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील, एका लंबवर्तुळाकार पठारावर, विशाल आणि अतिसुंदर अशा एका प्रशासकीय इमारतीसह १४ संकुले, एक मध्यवर्ती ज्ञानस्रोत संसाधन केंद्र यांची मोठ्या वेगाने विद्यापीठ परिसरात प्रगती होत आहे. तथापि, आम्ही आमच्या स्वत:च्या इमारतीत येण्यापूर्वी काही काळ जैवशात्र संकुलाच्या इमारतीत कार्यरत होतो. आवश्यक पायाभूत उपकरणे आणि सुविधा, सुविद्य अध्यापक वृंद आणि स्वत:ची सुसज्ज इमारत, जी की आता विस्तारित होण्याच्या वळणावर आहे, येथे पर्यावरणशास्त्र, भूगोलशास्त्र आणि भू-भौतिकशास्त्र या विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. भूशास्त्र संकुलाने दुर्मिळ संकलन आणि अतिशय सुव्यवस्थित मांडणी असलेले भूगर्भशास्त्रीय संग्रहालय आणि एक अद्वितीय असे एक भूकंप मापन केंद्र विकसित केलेले आहे. संकुलाने हळूहळू परंतु सातत्य ठेवत महाराष्ट्राच्या विविध भागातीलच नव्हे तर इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनाही आकर्षित केली आहे.

भूशास्त्र संकुल अगदी स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, उच्च-गुणवत्तेच्या अध्यापनासाठी आणि भूशास्त्रातील मूलभूत संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस उत्तेजन देणारे आणि प्रेरणादायक वातावरण प्रदान करण्याबाबत संकुल हे अग्रेसर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावलैकिक प्राप्त असे संकुलात अध्यापक आहेत. शैक्षणिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कार्य करण्याची सकारात्मक बांधिलकी असणे, हेच आमच्या संकुलाचे बलस्थान आहे. संशोधनाचे वातावरण आणि उत्साह निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर पातळीवर संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण करण्याचे अनिवार्य केले आहे. केवळ विद्यमान सांख्यिकीचे संकलनच नसून प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्माण केलेल्या नवीन आकडेवारीवर आधारित असे हे प्रकल्प असतात. आहेत. “शनिवार चर्चासत्र” या नावाने सुरु असलेल्या साप्ताहिक सादरीकरणामध्ये, हे पदव्युत्तरचे संशोधक विद्यार्थी आपल्या विविध कल्पना मांडतात. ज्यामुळे त्यांच्या संशोधनात्मक प्रकल्पाचे कार्य वेळेत पूर्ण होण्याबरोबर, संशोधनात्मक विचारधारा आणि प्रगल्भता यांचाही विकास होतो.

अनेक भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांमार्फत आयोजित करण्यात येणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांत भूशास्त्र संकुलाचे विद्यार्थी हे सातत्याने सहभागी होत आहेत. संकुलाचे विद्यार्थी केवळ या कार्यक्रमांमध्ये वा स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभागी होत नाहीत तर त्यातील बर्‍याच जणांनी ‘उत्कृष्ट सहभागी’ चा किताब पटकाविला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्था (CSIR-NGRI), हैदराबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई, भारतीय भूकंप विज्ञान संशोधन केंद्र, अहमदाबाद, आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), हैदराबाद, अणु-खनिज विभाग, हैदराबाद, तेल आणि नैसर्गिक वायू कार्पोरेशन (ONGC), गोवा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, हैदराबाद, राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (NRSC), हैदराबाद, पर्यावरणीय औद्योगिक क्षेत्र, पुणे, आंध्रप्रदेशराज्य सुदूर संवेदन अनुप्रयोग केंद्र (APSRAC), हैदराबाद आणि यांसारख्या इतर संस्थांनी आयोजित केलेल्या उन्हाळी आणि हिवाळी प्रशिक्षण वर्गांमध्ये आमचे विद्यार्थी निरंतरपणे सहभागी होत आहेत.

आमच्या भूभौतिकीशास्त्र आणि भूगर्भशास्त्राच्या पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना, प्रती महिना रुपये १०००/- याप्रमाणे १० महिन्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIG), मुंबई ही संस्था विद्यार्थ्यांस ५ शिष्यवृत्त्या (GRASP-IIG) प्रदान करीत आहे. भूशास्त्र संकुलातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठीची ही IIG ची एक अनोखी शिष्यवृत्ती आहे.

अमेरिका सोडून इतर देशासाठी, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल जिओलॉजिस्ट (AIPG) ने प्रथमच एक विशेष दर्जा म्हणून भूशास्त्र संकुलास “आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अध्याय” उभारण्यास मान्यता दिली आहे. अशाचप्रकारे संकुलाचा इतर अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार (MOU) आणि शैक्षणिक सहयोग आहे. NGRI, IIG, NCS, ISR, GSDA, यांसारख्या संशोधन संस्थांशी असलेल्या शैक्षणिक सहयोगातून विद्यार्थी प्रशिक्षण आणि अभिनव संशोधन कार्यक्रम राबविले जात आहेत. याशिवाय शैक्षणिक संबंध आणि भू-विज्ञान क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी संकुलाने विविध महाविद्यालयांशी ही सामंजस्य करार केलेले आहेत.

मागील २५ वर्षांत अनेक नामांकित विद्वानांनी संकुलास भेट दिली आहे. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मश्री डॉ. एच.के. गुप्ता, पद्मश्री डॉ. व्ही.पी. डिमरी, डॉ. कृष्णा लाल (अध्यक्ष, INSA), डॉ. व्ही. राजामणी (JNU, नवी दिल्ली), प्रा. सी. लीलानंदम (उस्मानिया विद्यापीठ), प्रा. व्ही.के. गौर (नामवंत वैज्ञानिक, IIA), डॉ. टी. राधाकृष्ण (NCESS), डॉ. टी. हरिनारायणा (संचालक, GERMI, गुजरात), डॉ. वाय.व्ही.एन. कृष्णा मूर्ती (संचालक, NRSC, हैदराबाद), डॉ. स्वर्णा सुब्बाराव (सर्व्हे ऑफ इंडिया, भारत सरकार), डॉ. व्ही.के. गहलौत (संचालक, राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्र, नवी दिल्ली), डॉ. एस.व्ही.एस. कामेश्वर राव (GM, RSRAC – ISRO, नागपूर), प्रा. प्रवीण सप्तर्षी (प्रोफेसर इमेरिटस, SPPU, पुणे), डॉ. एच. सर्वोथमन (माजी उप-महासंचालक, GSI), डॉ. माला बगीया (वैज्ञानिक, IIG, मुंबई), प्रा. के.एस. कृष्णा (हैदराबाद विद्यापीठ), डॉ. व्ही. सुरेश बाबू (NIRD, हैदराबाद) आणि प्रा. बी.सी. वैद्य (JNU, नवी दिल्ली) यांच्या पदस्पर्शाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ संकुलातील सर्व घटकांस झालेला आहे.

संकुलाने युएसएहून आलेल्या “फुलब्राईट फेलो”स आपल्या सुविधा पुरविल्या आहेत. डॉ. एल. जो. मॉर्गन, जॅक्सन विले विद्यापीठं अलाबामा, यूएसए यांनी “फुलब्राईट फेलो” म्हणून संकुलात आपली सेवा, सन २०११ मध्ये ५ महिने दिली. त्यांनी या काळात, स्वत: तयार केलेला भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा अभ्यासक्रम संकुलातील विद्यार्थी-शिक्षक यांना शिकविला. त्यांनतर सन २०१२ मध्ये डॉ. जिम जेकब्स, स्टीव्ह बेकर आणि चिन मॅन मॉक यांनीही “फुलब्राईट वरिष्ठ विशेषज्ञ अनुदान” अंतर्गत ६ आठवड्यांसाठी संकुलास सेवा पुरविली आहे.

चालू घडामोडी

सध्या संकुलात, १३५ हून अधिक पदव्युत्तरचे विद्यार्थी भूगर्भशास्त्र, भूभौतिकीशास्त्र, पर्यावरण शास्त्र आणि भूगोलशास्त्र या चार वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त, संकुलामध्ये भू-माहितीशास्त्र पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून औद्योगिक सुरक्षा व व्यावसायिक आरोग्य हे एक वर्ष कालावधीचे दोन अभ्यासक्रम चालविले जात आहेत.

आतापर्यंत संकुलातील ५८ संशोधकांस “विद्या-वाचस्पती” (PhD) या उच्चतम पदवीने गौरविण्यात आले आहे. सध्या संकुलामध्ये ५० पीएच.डी. आणि एम.फिलचे संशोधक अत्याधुनिक, मूलभूत आणि सामाजिक-उपयोगिता असलेले संशोधनात्मक विषय अभ्यासात आहेत. यापैकी अनेक संशोधक-अभ्यासकांनी त्यांचे संशोधन करण्यासाठी DST--इंस्पायर, CSIR, यूजीसी, ICSSR, बार्टी, RGNF आणि इतर शिष्यवृत्त्याचा लाभ मिळविलेला आहे. गेल्या ५ वर्षात संकुलामधून दिले गेलेले १२० पेक्षा जास्त शोधनिबंध, उच्च-श्रेणी व अति-प्रभाव असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत, ही बाब खरेतर संकुलाच्या संशोधनातमक गुणवत्तेची साक्ष देत आहे.

संकुलात होत असलेल्या संशोधन कार्यामध्ये “संशोधन प्राधान्य क्षेत्र” म्हणून गोड्या पाण्याच्या गुणवत्तेचे सूक्ष्मजीव मूल्यांकन, भूगर्भजलाच्या फ्लोराईडमधील मलीनता (दूषण), भूजल प्रदूषण, भूमी उपयोजनाचा नकाशाबंध (मॅपिंग), पर्यावरणशास्त्रचा अभ्यास (माहिती-शिक्षण), आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक व वस्ती भूगोल, पीक व मृदाशास्त्र, शेती-जल संसाधन व्यवस्थापन, कृषी-हवामानशास्त्र, भूगर्भ रचना आणि भ-स्तर विचलणासाठी भूकंपिय सांख्यिकीची प्रतिमाने, भूजल आणि खनिज संसाधनांसाठी भू-भौगोलिक अनुप्रयोग, मॅग्मॅटिक सेडिमेंटरी प्रक्रियेची भू-रासायनिक प्रतिमाने, इत्यादींवर विशेष जोर देण्यात येत आहे.

सध्या कायमस्वरूपी असलेले १२ अध्यापक आहेत, ज्यामधील दोन अध्यापक अलीकडेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचबरोबर आठ अंशदायी अध्यापक आपल्या विषय-निपुणत्वाची सेवा संकुलास देत आहेत. संकुलातील या अध्यापकांनी संस्थात्मक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव आणि ओळख मिळविलेली आहे. त्यामध्ये INSA शिक्षक पुरस्कार (२०१८), सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा महाराष्ट्र राज्य शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार (२०१८), युरोपियन असोसिएशनचे भू-वैज्ञानिक आणि अभियंता – PACE पुरस्कार (२०१३, २०१६ आणि २०१९), महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (२००९-१० आणि २०१३-१४), स्वा.रा.ती.म. विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (२०१०-११ आणि २०१३-१४), राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार, केंद्र शासन - खाण मंत्रालय (२०१३), JGSI-बी.पी. राधाकृष्ण पुरस्कार (२००९), इंडो-यूएस रिसर्च फेलोशिप (२००८-२००९), बॉयस्कास्ट (२०००-२००१) फेलोशिप, इत्यादींनी गौरविल्याची विशेषत्वाने नोंद घेतली पाहिजे. संकुलाचे अध्यापक हे भूगर्भीय सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन जिओफिजिकल युनियन आणि इतर वैज्ञानिक संस्थांचे आजीवन सदस्य आणि सन्माननीय संशोधक-फेलो आहेत.

कुलगुरू, प्रभारी कुलगुरू, संचालक (महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ), संचालक (आंतरविद्याशाखीय संकुल), उच्चाधिकारी (डीन), समन्वयक (विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद - NAAC आणि अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष – IQAC), कार्यक्रम अधिकारी (राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ परिसर युनिट), समन्वयक (राज्यस्तरीय अविष्कार कार्यक्रम), समन्वयक (राज्यस्तरीय आव्हान-२०१९ प्रशिक्षण कार्यक्रम), सदस्य (व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद आणि अधिसभा), मुख्याधिकारी आणि कक्षाधिकारी (मुले-मुलींचे विद्यापीठ वसतीगृह), समन्वयक (विद्यापीठस्थित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र), समन्वयक (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान – RUSA) आणि अशा विविध पदांवर प्रस्तुत विद्यापीठामध्ये संकुलाच्या अनेक अध्यापकांनी आपली सेवा देवून कार्य-क्षमता सिद्ध केली आहे.

संकुलास UGC-SAP, DST-FIST, RUSA आणि UGC-इनोव्हेटिव्ह कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. अध्यापकांकडून अनेक लोकोपयोगी आणि   कौतुकास्पद प्रायोगिक प्रकल्प चालविले जात आहेत. संकुलाने यासारख्या अर्थ-सहाय्य करणाऱ्या नामांकित संस्थांकडून संशोधनात्मक प्रकल्पांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचे अनुदान आजपावेतो प्राप्त केलेले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान – RUSA अंतर्गत “भूकंपशास्त्राचे उत्कृष्टता केंद्र” अलीकडेच मंजूर झालेले असून ते उभारले जात आहे.

छत-पर्ज्यन्य जल संचयन (रेन-रूफ वॉटर हार्वेस्टिंग) यांसह अनेक सामाजिकदृष्ट्या उपयोगी उपक्रम, जसे कि भूकंप जागरूकता, दुरस्त-ऑनलाईन कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय भू-विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा (IESO), राष्ट्रीय विज्ञान दिन, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा DST-इंस्पायर उपक्रम, शालेय मुलांना संकुलातील प्रयोगशाळा आणि संग्रहालय पाहण्यासाठी आमंत्रित करणे, नांदेड महानगरपालिकेकडील भूकंप-मापनाच्या सांख्यिकीय माहितीची देखरेख, देखभाल आणि पृथ:करण करणे, लोकप्रिय व्याख्याने, रेडिओ वार्ता व टीव्हीवरील मुलाखती, पोलिस मित्र कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक कार्यक्रमांत शांतता राखण्यास सहाय्य करणे, समाजात आपत्ती निवारणासाठीचा पर्यायी-बहुआयामी दृष्टिकोनाचा वृद्धिंगत करणे, पर्यावरण शिक्षण व जागरुकता कार्यक्रम, गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलन व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे, मतदार जण-जागृती कार्यक्रम, राष्ट्रीय एकता रॅली, तिरंगा रॅली, रक्तदान शिबिरे व स्वच्छ भारत अभियान राबविणे, स्वच्छता मोहीम काढून जण-जागृती करणे, आदी कार्यक्रमांचे संकुलामार्फत आयोजन केले जात आहे.

भविष्य वेध

सध्या राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (NAAC) आणि यूजीसी यांचेसह अनेक मूल्यमापन करणार्‍या संस्थांनी भूशास्त्र संकुल हे विद्यापीठ परिसरातील सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याचा शेरा दिला आहे. विद्यापीठातील सर्व संकुलांमध्ये, भूशास्त्र संकुल हे “प्रथम क्रमांकाचे” ठरल्याचे अनेक उपक्रमांतून सिद्ध झाले आहे, जसे कि 'क्रेडिट प्रणाली' आणि 'CBCS' पॅटर्न चालू करणे, ‘क्रेडिट एक्सचेंज’ ची संधी उपलब्ध करून देणे, वैयक्तिक संशोधन प्रकल्प सुरू करणे, DST कडून “FIST” तर यूजीसीकडून “SAP” ह्या योजनांचा लाभ मिळविणे, तसेच यूजीसीचा “नाविन्यपूर्ण कार्यक्रम” (UGC–Innovative Program), USIEF कडील 'फुलब्राईट फेलो' यांना संधी देणे, OHP आणि LCD यासारख्या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वर्ग खोल्यांची उभारणी करणे, सर्व अध्यापकांना लॅपटॉप - संगणक प्रदान करणे, संयोगी अध्यापक (अडजंक्ट फॅकल्टी) असणे, अनेक विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औद्योगिक युनिटे यांच्यासोबत सामंजस्य करार असणे, इत्यादी उपक्रम विद्यापीठात आमच्या भूशास्त्र संकुलाने सर्व प्रथम सुरु केले वा उभारले आहेत.

स्थापनेच्या पहिल्या पंचवीस वर्षांत प्रभावी प्रगती साधल्याने, आमच्याकडे संकुलाच्या भविष्यासाठीची निश्चित उद्दिष्ट्ये आहेत. सध्या संकुलातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अधिकच्या पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे.  आणि त्यामध्ये प्रगत संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक साधने मिळवण्याच्या महत्वाकांक्षी मार्गावर संकुल मार्गाक्रम करीत आहे. संकुलातील प्रत्येक विद्यार्थी नामांकित विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रशिक्षण घेईल, त्यासाठी संकुल विशेषत्वाने प्रयत्नशील आहे. गुणवत्तेच्या आधारे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यासाठीही संकुलाची अविरत धडपड चालू असते. संकुलाचा प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदव्युत्तर शोध प्रबंधातून किमान एकतरी संशोधनात्मक शोध निबंध प्रकाशित करावा.

संकुलामार्फत “कॅम्पस भरती प्रक्रिया” एका प्रायोगिक प्रमाणात सुरू केली असून यावर्षी १५ हून अधिक विद्यार्थी विविध ठिकाणी भरती झालेळे आहेत. नजीकच्या भविष्यात आमचे सर्व विद्यार्थी ऑन-कॅम्पस भरती प्रक्रियेत ‘नोकरीस’ लागतील, हे स्वप्न आम्ही नजीकच्या काळात पूर्ण करू असा विश्वास वाटत आहे.

भूशास्त्र संकुल हे एक भू-विज्ञान क्षेत्रात, बहुंगांनी विकसित होत असलेले आणि निरंतर तेजपुंज्य शैक्षणिक विकास करत असलेले भारतातील संकुल आहे. आम्ही, सर्व भागधारक, येत्या ५ वर्षात आपल्या देशातील पहिल्या १० भू-विज्ञान विभागांपैकी एक भूशास्त्र संकुल असेल, असे स्वप्न पाहत आहोत..... आमचा विश्वास आहे की आम्ही त्या दिशेने जात आहोत.

मार्गाक्रम निरंतर आहे !!

अध्यापक वृंद, संशोधक विद्वान, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी,

भूशास्त्र संकुल,

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,

नांदेड – ४३१६०६, महाराष्ट्र (भारत).

कॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.