About the School

ललित व प्रयोगजीवी कला संकुलाची स्थापना ही ललित कला, चित्रकला, अभिनय, नाट्यनिर्मीती, संहिता लेखन, चित्रपट, पटकथा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, लोकवाद्य, संगीत, शास्त्रीय संगीत लोककला, इत्यादी विषयाच्या अभ्यासाला चालना देण्याच्या हेतूने सन २०१० मध्ये करण्यात आली. आधुनिकिकरणच्या तथा जागतिकिकरणाच्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे हा संकुलाचा हेतू आहे.


संकुलात प्रयोगजीवी कलांचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. या सर्व कला व्यावसायीकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे या क्षेत्रात अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची, अभ्यासकांची वेगळी ओळख निर्माण होते. सध्याचा काळ हा ज्ञान - विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत पारंपरिक लोककला, लोकनृत्य,शास्त्रीय नृत्य लोकगीत, लोकवाड्.मय, अभिनय, सांस्कृतिक वेगळेपण, कलेची भाषा इ. गोष्टीकडे आजचा विद्यार्थी आकर्षित व्हावा, हा प्रामाणिक हेतू संकुलाचा आहे.


मागील चौदा वर्षापासून संकुल नाटक, आणि विविध कलामहोत्सव व वाडःमयीन घडामोडींचे केंद्रबिंदू राहीलेले आहे. विविध नामांकित लेखक, नाट्य कलावंत, दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार, गायक -वादक, संशोधक अभ्यासक आणि तज्ज्ञ प्राध्यापकांना संकुलात व्याख्यानांसाठी आणि कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात येते.


बदलल्या काळाचे स्वरूप लक्षात घेता संकुलाने परंपरा आणि नवता यामध्ये योग्य सांगड घालण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीले आहे. ‘जुन्याचं जतन आणि नव्याचा स्वीकार‘ करून सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक वेगळेपण जोपासण्यासाठी संकुल नेहमीच तत्पर राहीले आहे. विद्यापीठ परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, संशोधनात्मक इ. विकास साधण्यासाठी संकुलाची विशेष भूमिका राहीलेली आहे. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अध्यापनाची अद्ययावत संसाधने, अध्यापनात संवादी दृष्टीकोन, नाविन्य व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग आणि विद्यार्थी व पालकांबरोबर चर्चा घडवून आणण्यासाठी संकुल नेहमीच पुढाकार घेते.

 

Read More....

 

Director (I/c)
School of Fine & Performing Arts

Copyright © 2020 srtmun.ac.in. All Rights Reserved.