Photos - LIGO Workshop

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे लायगो इंडियाःस्टार फेस्ट-२०२२ चे उत्साहात उद्घाटन.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली या महाविद्यालयामध्ये दिनांक ०५/०८/२०२२ रोजी लायगो इंडिया व आयुका च्या वतीने लायगो इंडिया: स्टार फेस्ट चे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू आदरणीय डॉ. उध्दवजी भोसले हे होते. प्रमूख म्हणून हिंगोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी मा. श्री जितेंद्र पापळकर, जिल्हा परीषद हिंगोलीचे मूख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उप-शिक्षण अधिकारी हिंगोली चे श्री नितीन नेटके, वरीष्ठ प्राध्यापक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे डॉ.  माधव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.के. शिंदे, शासकिय तंत्रनिकेतन हिंगोलीचे प्राचार्य अशोक उपाध्याय, गटशिक्षणाधिकरी औढा मा. श्री सोनुने हे उपस्थित होते.

 

Copyright © 2020 srtmun.ac.in. All Rights Reserved.