विकसित भारत युवा संसद २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर Click करावे :

मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी १८ ते २५ वयोगटातील युवक युवतीनी विकसित भारत युवा संसद २०२५ मध्ये सहभाग घेण्याबाबत केले आवाहन.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार,क्षेत्रीय निदेशक, रासेयो क्षेत्रीय निदेशालय, पुणे, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत युवा संसद 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी जी नोंदणी दिनांक 16 मार्चपर्यंत करण्यात आलेली आहे सदरील युवा संसदेचा अधिक प्रसार प्रचार व्हावा यासाठी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी श्री मोहम्मद शकील अब्दुल करीम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, स्कूल ऑफ मीडिया सायन्स चे प्रा. डॉ. दीपक शिंदे उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. हुशारसिंग साबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, आयोजक महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. गोविंदराव घार, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, राष्ट्रीय सेवा योजनेचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, नेहरू युवा केंद्राच्या नोडल अधिकारी डॉ. चंदा रावळकर, यांनी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील युवक युवतीनी विकसित भारत युवा संसद २०२५ मध्ये सहभाग घेण्यासाठी दिनांक २७ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२५ पर्यंत आपली नोंदणी (mybharat.gov.in) माय भारत पोर्टलवर करण्यासाठी आवाहन केले आहे. तरी जिल्हास्तरावरील निवड प्रक्रिया दिनांक २५ व २६ मार्च २०२५ रोजी जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथे संपन्न होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेचे प्रवास खर्च साधे तिकीट आयोजकाच्या वतीने मूळ तिकीट सादर केल्यानंतर देण्यात येईल. तत्पूर्वी १६ मार्च २०२५ पर्यंत युवक युवतीनी माय भारत पोर्टलवर विकसित भारत युवा संसद २०२५ सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.
विषय - What does Viksit Bharat mean to you? आपल्याला विकसित भारताविषयी काय वाटते? भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी वय २४ फेब्रुवारी २०२५ रोजी २५ वर्षे असणे
व्हिडिओ तयार करताना नाव जिल्हा, राज्य या क्रमाने लिहावे. पाठीमागे कुठलाही प्रकारचा आवाज नसावा. स्पष्ट असा आवाज असावा २५ एम.बी. पेक्षा मोठा व्हिडिओ नसावा उच्चार स्पष्ट असावेत. व्हिडिओ फक्त एकच मिनिटाचा तयार करावा, किंवा व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून YouTube ची लिंक माय भारत पोर्टलवर युवकांनी अपलोड करणे अनिवार्य आहे. अंतिम मुदत १६ मार्च २०२५ आहे.
व्हिडियो फॉरमॅट mp4.mkv.mov.mpeg.avi.wmv.flv.
यामधून निवडलेल्या 150 विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय चार जिल्हयांचे (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) निवड शिबिर जयक्रांती महाविद्यालय लातूर येथील विकसित भारत युवा संसद २०२५ मध्ये सहभाग घेता येईल सदरील युवा संसद ही १८ ते २५ वयोगटातील सर्व युवक युवतींना खुली असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले व महाविद्यालय बाहेरील इच्छुक युवक युवतींना यामध्ये सहभाग घेता येईल तरी जास्तीत जास्त युवकांनी या युवा संसदेमध्ये सहभाग घेऊन देशाचे पंतप्रधान यांच्याशी विकसित भारत २०४७ या विषयाच्या अनुषंगाने आपणास संवाद साधण्याची संधी युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.